फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याची पवारांनी उडवली खिल्ली !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  राज्यात भाजप पक्षाचे दिग्गज नेते महाविकास आघाडीच्या विरोधात आपला पक्ष बळकट करून पुन्हा एकदा लोकसभेत सत्तेवर आणण्यासाठी देशात मोट बांधण्याचे काम सुरु असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एक वक्तव्य नागपुरात केले होते.

त्यांनी मोदी हे वाघाप्रमाणे आहेत. कितीही जनावरं एकत्र आली तरीही ते वाघाची शिकार करु शकत नाही. मोदी वाघाप्रमाणे आहेत त्यांच्याविरोधात विरोधक कितीही एकत्र आले तरीही ते मोदींसारख्या वाघाची शिकार करु शकणार नाहीत असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चाईल्डिश वक्तव्य असं म्हटलं आहे. तर “राजकारणात अजूनही पोरकट वक्तव्यं करणारा एक वर्ग आहेच, असं म्हटलं आहे. तर चाईल्डिश जे वक्तव्य करतात त्यावर काय बोलायचं?.” असा प्रश्न करत पवार यांनी फडणवीस यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम