अजित पवारांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ जून २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाच्या आमदार मनिषा कायंदे यांनी नुकतेच शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे ठाकरे गटाकडे असणारे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद संकटात सापडले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या एका विधानाने याचे संकेत मिळालेत. विधान परिषदेत ज्यांच्याकडे संख्याबळ, त्यांचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे महाविकास आघाडीत कुरबुरी वाढण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाचे आमदार आमदार विप्लव बाजोरिया यांनी 2022 मध्येच ठाकरे गटाला रामराम ठोकत शिंदे गटात प्रवेश केला होता. काल मनिषा कांयदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने आता विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संख्याबळ ठाकरे गटापेक्षा जास्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र कायंदेंनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने विधानपरिषदेमधील विरोधीपक्ष नेतेपदही ठाकरे गटाकडून जाणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. असे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आल्याने राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. कायंदे यांनी ठाकरे गटाला रामराम केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी 9 आमदार आहेत.

अजित पवार म्हणाले की, विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासंदर्भात आपल्या डोक्यात तसा काही विचार नव्हता. मात्र, पत्रकारांनी लक्षात आणून दिल्यावर आपण या संदर्भात विचार करणार असल्याचे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले की, 2014 मध्ये आमच्या पक्षाचे 41 आमदार निवडून आले होते. तर काँग्रेसचे 42 आमदार निवडून आले होते. यावेळी आमच्यासासेबत 3 अपक्ष आमदार होते. मात्र, तात्कालिन विधानसभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी ज्या पक्षाचे संख्याबळ जास्त त्यांचाच विरोधी पक्षनेता, अशी भूमिका मांडली होती. तर आताही ज्यांचे आमदार जास्त त्यांचाच विरोधी पक्षनेता अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम