पवारांनी दिली मोदींच्या पाठीवर थाप ; राजकीय चर्चेला उधान !
बातमीदार | १ ऑगस्ट २०२३ | आज राज्याच्या दौऱ्यावर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असून त्यांना लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने देण्यात येणारा ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार’ आज प्रदान करण्यात येत आहे. तर मोदींच्या या दौऱ्यावर कॉंग्रेसने जोरदार विरोध जरी केला असला तरी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार व्यासपिठावर असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कार्यक्रमाच्या मंचावर मोदी दाखल होताच उपस्थितांनी उभं राहात मोदींचं स्वागत केलं. त्या रांगेमध्ये शरद पवार हेदेखील उपस्थित होते.
दीपक टिळक यांच्या बाजूला शरद पवारांची आसनव्यवस्था आहे. पंतप्रधान मोदी जेव्हा शरद पवारांच्या जवळ पोहोचले तेव्हा पवारांनी हस्तांदोलन करीत मोदींचं स्वागत केलं. यावेळी क्षणभर दोघांमध्ये काहीतरी चर्चा झाली अन् शरद पवारांनी हसून मोदींच्या पाठीवर थाप टाकली. बाजूला उभे असलेल्या सुशीलकुमार शिंदेंच्या चेहऱ्यावरदेखील हास्य फुलले होते. दोघांमध्ये नेमकं काय बोलणं झालं हे कळू शकलं नसलं तरी उपस्थितांच्या चेहऱ्यावरील हास्य लपून राहिलं नव्हतं. शिवाय पवारांनी मोदींच्या पाठीवर थाप दिल्याने चर्चांना उधाण आलेलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम