पवार करणार नव्याने सुरुवात तर अजित पवार फडणवीसांच्या भेटीला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जुलै २०२३ ।  राज्यातील शिंदे व फडणवीस यांच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सोमवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी साताऱ्याच्या कराड येथे आपले गुरू माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी जाऊन श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करण्याचा निर्धार व्यक्त केला. केंद्रातील सत्ताधारी भाजप देशभरात लोकशाही मार्गाने निवडून आलेली सरकारे पाडत आहे. महाराष्ट्रातही असेच घडले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला संघटित होऊन आपली ताकद दाखवावी लागेल. महाराष्ट्रात जातीचे राजकारण चालणार नाही. ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आपण नव्याने सुरुवात करू. आम्ही 5 जुलैला सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली आहे, असे ते म्हणाले.

यावेळी प्रीतीसंगमावर पवारांचे हजारो समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या माध्यमातून शरद पवारांनी आपले शक्तीप्रदर्शन केल्याचाही दावा केला जात आहे. दुसरीकडे, अजित पवार छगन भुजबळांसोबत देवेंद्र फडणीसांच्या निवासस्थानी पोहोचलेत. राष्ट्रवादी काँग्रेसने एका पत्राद्वारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर व निवडणूक आयोगाकडे अजित पवार व इतर 8 बंडखोरांना अपात्र घोषित करण्याची मागणी केली आहे. या पत्रात नमूद करण्यात आले आहे की, पक्षाची सर्व सूत्रे शरद पवारांकडे आहेत. शरद यांनीच 1999 मध्ये पक्षाची स्थापना केली होती. त्यामुळे अजित यांच्या पक्षावरील दाव्याशी संबंधित कोणत्याही याचिकेवर सुनावणी करताना आमची बाजू ऐकली जावी. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसने जितेंद्र आव्हाड यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते व चीफ व्हीपपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी अजित पवार यांच्याकडे ही जबाबदारी होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम