पवारांनी त्यातून माघार घेतली ; फडणवीसांनी केला खुलासा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  राज्यातील भाजपचे नेते देवेद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी २०१९ मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर पहाटे शपथविधी घेतला होता. भल्या पहाटे हा शपथविधी घेतल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. या शपथविधीबाबत अनेकांच्या मनात अद्याप मोठा संभ्रम आहे. तर अनेक मुलाखती, चर्चासत्रे यावेळी अनेक वेळा हा विषय समोर येतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा खुलासा केला आहे. या शपथविधीच्या तीन-चार दिवस आधी नेमकं काय घडलं? याचा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

पहाटेच्या शपथविधीवर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुळखतीवेळी भाष्य करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “शरद पवार यांची मिस्ट्री समजून घ्यायची असेल तर आधी त्यांची हिट्री समजून घ्यायला हवी. तरच ही मिस्ट्री समजेल. पुढे ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी जेव्हा युती तोडून मुख्यमंत्र्याच्या खुर्चीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर बोलणी सुरू केली. त्यानंतर त्यांनी आमचा फोनही घेणं बंद केलं होतं”, “ते आमच्याबरोबर येणार नाहीत, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही आमच्याकडे काय पर्याय आहेत? याचा विचार केला. तेव्हा राष्ट्रवादीच्या काही लोकांनी आम्हाला सांगितलं की, एनसीपी भाजपाबरोबर येऊ शकते. ते स्थिर सरकार देऊ शकतात.”
पुढे फडणवीस म्हणाले की, “यानंतर आमची शरद पवारांबरोबर बैठक पार पडली. त्या बैठकीत ठरलं की, महाराष्ट्रात भाजपा-राष्ट्रवादीचं सरकार स्थापन केलं जाईल. सरकार कसं असेल, याचा आराखडा तयार झाला. त्यानंतर मी आणि अजित पवार आम्ही दोघं सरकारचं नेतृत्व करणार, हेही ठरलं होतं. सर्व अधिकार आम्हाला दिले. त्याप्रमाणे आम्ही सगळी तयारी केली. पण शेवटच्या क्षणी शरद पवारांनी त्यातून माघार घेतली,” असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

“आमचा शपथविधी होण्याच्या तीन ते चार दिवस आधी शरद पवारांनी माघार घेतली. पण अजित पवारांकडे भाजपाबरोबर येण्याशिवाय कोणताही पर्याय उरलाच नाही. आम्ही संपूर्ण तयारी केली होती. त्यानंतर अजित पवार आणि मी शपथ घेतली. कारण आपण शरद पवारांबरोबर इतक्या बैठका घेतल्या आहेत, त्यामुळे बाकीचे आमदार आणि शरद पवार आपल्याबरोबर येतील, असा विश्वास अजित पवारांना होता”, असंही ते पुढे म्हणालेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम