नुकसान भरपाई द्या अन्यथा उपोषणास बसणार शेतकरी
भडगाव/प्रतिनिधी
वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तिन वर्ष लोटले तरी शेतकर्याना शासनाकडुन दमडीही मिळाली नाही. त्यामुळे या नुकसान भरपाईबाबत शासनाने 15 दिवसाच्या आत निर्णय घ्यावा अन्यथा नुकसानग्रस्त शेतकरी तहसिल कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
भडगाव तालुक्यात 11 जुन 2019 ला मान्सूनपूर्व वादळी पाऊस झाला. त्यात 8-10 खेड्यातील 852 शेतकर्याचे 567 हेक्टरवरील केळी व फळबागा उध्वस्त झाल्या. त्यामुळे शेतकर्याचे आतोनात नुकसान झाले. त्यावेळी तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, आमदार, खासदार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून मदत मिळवून देण्याबाबत आश्वासन दिले. त्यानंतर आमदार कीशोर पाटील यांनी ही यबाबात सातत्याने पत्रव्यवहार केला. मात्र तिन वर्ष होत आले तरी नुकसान भरपाई मिळालेली नाही.
सुधारीत प्रस्ताव देऊनही भरपाई मिळेना
26 एप्रिल 2022 रोजी तत्कालीन मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या दालनात या संदर्भात बैठक झाली. त्याच्यां सुचेनेनुसार सुधारीत प्रस्ताव ही पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर काहीएक हालचाल होतांना दिसत नाही. वादळात 10 -15 वर्ष जगवलेले फळबागा उध्वस्त झाल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यामुळे भरपाई केव्हा मिळेल? असा सवाल नुकसानग्रस्त शेतकर्याकडुन विचारला जात आहे.
जिल्ह्याला भरपाई दिली पण तालुक्याला वगळले
शासनाकडुन 30 ऑगस्ट 2022 ला जळगाव जिल्ह्यासाठी जुलै ते ऑक्टोंबर 2019 या कालावधीत अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकर्यासाठी 35 कोटीची मदत जाहीर केली. मात्र भडगाव तालुक्यात 11 जुन 2019 ला वादळी पावसात शेतकर्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जुलै ऐवजी जुन 2019 पासुन कालावधीचा सुधारीत शासन निर्णय काढण्यात यावा अशी मागणी शेतकर्याकडुन करण्यात आली आहे.
शेतकरी बसणार उपोषणाला
तिन वर्षांपासून मातीपासून वंचीत असलेल्या शेतकर्याना मदत देण्यासंदर्भात 15 दिवसात काही निर्णय न झाल्यास गिरणा पट्ट्यातील
नुकसानग्रस्त शेतकर्या उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत काल तहसिलदार मुकेश हीवाळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पिचर्डे दिपक महाजन, वडजी सुधाकर पाटील (पत्रकार), स्वदेश पाटील, भाऊसाहेब परदेशी, दिपक पाटील, शिवणीचे प्रविण पाटील, बोदर्डेचे सोमनाथ पाटील, मनोज पाटील आदि उपस्थित होते.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम