चित्रपटात सस्पेन्स आणि थ्रिलरचा तडका : ‘भेडिया’चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ ।  अमर कौशिक दिग्दर्शित व बॉलिवूड स्टार वरुण धवन आणि क्रिती सेनन यांच्या आगामी ‘भेडिया’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरचे लोक कौतुक करत आहेत. 2 मिनिटे 55 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये वरुण धवन आणि क्रिती सेनन यांचा अभिनय पाहण्यासारखा आहे.

 

ट्रेलरच्या सुरुवातीला वरुण धवनला भेडिया चावल्याचे दाखवण्यात आले आहे. त्यानंतर त्याचे संपू्र्ण आयुष्यच बदलून जाते. डॉक्टरच्या भूमिकेत क्रिती वरुणवर उपचार करते. चित्रपटात व्हीएफएक्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. ट्रेलरमध्ये मजेदार संवाद आणि कॉमेडी आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर लोकांची चित्रपटाबद्दलची उत्कंठा चांगलीच वाढली आहे. दिनेश विजन यांची निर्मिती असलेला हा चित्रपट 25 नोव्हेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. वरुणच्या इंडस्ट्रीतील 10 वर्षांचा प्रवास निर्मात्यांनी या ट्रेलरसह साजरा केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम