राष्ट्रीय खेळ दिवस निमित्ताने स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल, (सी.बी.एस. ई.)अमळनेर येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी)शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाची स्थापना व विद्यार्थी प्रमुखांचा पदप्रदान सोहळा प्रमुख पाहुणे 49 एन.सी.सी बटालियन, अमळनेर सुभेदार श्रीमान.धरमबीर सिंग, सुभेदार श्रीमान. जसबिर सिंग तसेच अमळनेर शहराचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे संस्थेचे मार्गदर्शक श्री. बजरंग लालजी अग्रवाल, संस्थेचे अध्यक्ष श्री. नीरज अग्रवाल, सौ. ममता अग्रवाल,शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत कुमार देवरे व पालक वृंद यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला.
पदग्रहण समारंभ हा एक महत्त्वाचा प्रसंग आहे जिथे शाळा आपल्या आगामी नेत्यांना काही भूमिका आणि जबाबदाऱ्या सोपवते. जबाबदारी सोपविणे आणि मुलांना अधिकार देणे महत्वाचे आहे कारण ते त्यांना एकाच वेळी शक्तिशाली आणि काळजी घेण्याची आजीवन कौशल्ये शिकवत असतात.विद्यार्थ्यांना भावी जीवनात देशपातळीवरील राज्य कारभार कसा चालतो, देशातील उच्च प्रमुख पदे, त्यांच्या जबाबदाऱ्या आणि कार्य याविषयीचे धडे शालेय जीवनातूनच विद्यार्थ्यांनी गिरवावेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून पदग्रहण समारंभ साजरा करण्यात येतो.
विद्यालयात माध्यमिक विभागासाठी शालेय विद्यार्थी प्रमुख पदांची निवडणूक घेण्यात आली होती त्या निवडणुकीत विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली. पदप्रदान समारंभात पद व त्या नावाचे बॅचेस पालकांच्या हस्ते लावून विद्यार्थी प्रमुखांना गौरविण्यात आले. यात शालेय विद्यार्थी प्रमुख -कु.आयुष पाटील तसेच विद्यार्थिनी प्रमुख – कु.कीर्ती पाटील या इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना जबाबदारी देण्यात आली. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना हाऊस नुसार प्रमुख पदे देण्यात आली ती पुढील प्रमाणे- पृथ्वी हाऊस प्रमुख -कु. हिमांशू पांडव, कु.आर्या हिरे.आकाश हाऊस प्रमुख -कु.विराज साळुंखे,कु. उत्कर्षा पाटील. अग्नि हाऊस प्रमुख -कु. दिपदर्शन पाटील, कु. नक्षत्रा माळी. त्रिशूल हाऊस प्रमुख-कु.नमित जैन,कु.रिद्धी जैन आहेत. त्याचप्रमाणे क्रीडा प्रमुख -कु.मोहन पाटील, शालेय शिस्त प्रमुख -कु.परिणीता जाधव, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख -कु. श्रद्धा पाटील, ग्रंथालय प्रमुख कु.आरती कुमारी प्रजापति या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.निवड झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचा शपथविधी समारंभ पार पडला.शाळेचे मुख्याध्यापक श्री.हेमंत कुमार देवरे यांनी शपथविधी घेऊन विद्यार्थ्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. राहुल शिरसाठ तसेच सौ. सीमा पाटील यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम