जनतेला साखर देखील लागणार कडू ; जाणून घ्या काय आहे भाव ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ । गेल्या दोन वर्षापासून महागाईच वाढत असतांना आता पुन्हा एकदा सामान्य नागरिकांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. सध्या देशात प्रचंड साखरेची मागणी आहे. पण उत्पादन घटल्याने यंदा किचनमधील गोडवा हरवू शकतो. साखरेचे भाव वाढण्याची दाट शक्यता आहे. ग्राहकांना आता घरातील डाळ-धान्यासह साखरेच्या महागाईच्या झळा सहन कराव्या लागतील. गोडधोड करुन तोंड गोड करणेही आता परवडणार नाही. उन्हाळ्यात भारतात कोल्ड्रिंक्स आणि आईसक्रीमसाठी साखरेची मागणी वाढते. त्यामुळे साखरेने आता किचनमधील गोडवा कमी केला आहे. साखरेचे भाव वाढल्याने सर्वसामान्य जनतेच्या खिशाला पुन्हा चाट बसेल. त्यांना साखरेसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे.

भारतात साखरेच्या किंमतीत गेल्या दोन आठवड्यात 6% हून अधिकची वाढ झाली आहे. हा भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. मागणी वाढल्याने आणि उत्पादन घटल्याने या किंमती भडकल्या आहेत.उन्हाळ्यात घाऊक ग्राहकांकडून मागणी वाढू शकते. डीलर्सच्या दाव्यानुसार, यामुळे स्थानिक साखर कारखाने आणि साखर उत्पादकांना मोठा फायदा होईल. बलरामपूर चीनी, श्री रेणुका शुगर्स, डालमिया भारत शुगर आणि द्वारिकेश शुगर या सारख्या उत्पादकांना फायदा होईल. त्यामुळे ते शेतकऱ्यांची थकबाकी लवकरात लवकर चुकवू शकतील.
नवीन दिल्लीने जास्तीची साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. त्याचा परिणाम बाजारावर दिसून येत आहे. जागतिक भावाचा परिणाम दिसेल. जागतिक बाजारभाव सातत्याने वाढ होत आहे. बॉम्बे शुगर मर्चेंट्स असोसिएशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी यामागील कारण समोर आणले आहे. त्यानुसार, साखर उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. पण यंदा राज्यात साखरेची उत्पादन घटले आहे. त्यामुळे किंमतीत वाढ झाली आहे.

डीलर्सच्या अंदाजानुसार, 30 सप्टेंबर रोजी संपणाऱ्या मार्केटिंग वर्ष 2022-23 मध्ये महाराष्ट्रातील जवळपास 10.5 दशलक्ष टन उत्पादनाची शक्यता आहे. तर यापूर्वी 13.7 दशलक्ष टन साखर उत्पादनाचा अंदाज लावण्यात येत होता. येत्या काही महिन्यात किंमती अधिक भडकण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात घाऊक व्यापारी साखरेची अधिक मागणी नोंदवून खरेदी करु शकतात.
एप्रिल ते जूनपर्यंत, या तीन महिन्यात उन्हाळ्यामुळे भारतात कोल्ड ड्रिंक्स आणि आईसक्रीमच्या विक्रीत वाढ होणार आहे. साखरेच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. लग्नसराईमुळे साखरेच्या मागणीत आणखी वाढणार आहे. या वर्षात साखरेच्या मागणीत रेकॉर्ड 28 दशलक्ष टनपर्यंत वाढ होईल. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात साखरेच्या किंमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम