छत्रपती संभाजीनगरात झळकले औरंगजेबाचे फोटो !
दै. बातमीदार । ४ मार्च २०२३ । नुकतेच केद्र सरकारने राज्यातील दोन शहराचा नामांतरवर मंजुरी दिल्यानंतर औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतराविरोधात इम्तियाज जलील यांनी विविध पक्ष, संघटनांच्या सहकार्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणास सुरुवात केली. उपोषण हे फक्त आगामी आंदोलनाची सुरवात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान यावेळी औरंगजेबाचे फोटो झळकल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर नावाला विरोध करत एआयएमआयएमने औरंगजेबाचे फोटो झळकावले. औरंगाबाद कृती समितीच्या माध्यमातून हे आंदोलन सुरू आहे. यामध्ये कुठल्याही पक्षाचे बॅनर नाही. मात्र औरंगजेबाचे झळकवल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
यावेळी माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणाले, “याचा मी तिव्र निषेध करत आहे. हे सर्व नाटक आहे. छत्रपती संभाजी महाराजंच्या नावाला विरोध करणे चुकीचे आहे. इम्तियाज जलील यांचा जनाधार गेलेला आहे. त्यामुळे ते असे नाटक करत आहेत. मुस्लिम समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत. त्यामुळे हे षडयंत्र रचण्यात आले आहे. इम्तियाझ जलील यांनी त्यांच्या पोराचे नाव औरंगजेब का नाही ठेवलं. एआयएमआयएमच्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या मुलाचे नाव औरंगजेब ठेवावे. औरंगजेबाने मुस्लिम समाजाला सुद्धा त्रास दिला आहे. त्यांनी मंदिरे तोडले, एवढ प्रेम जलील यांना कसे वाटायला लागले.”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम