सेल्फी काढून अपलोड करता येणार फोटो…
बातमीदार | ७ ऑगस्ट २०२३ | देशात अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू करण्यात असून मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबविले जाणार आहे. नागरिकांना राष्ट्रध्वज उपलब्ध व्हावा, या उद्देशाने भारतीय डाक विभागाने त्यांच्या सर्व कार्यालयांमध्ये राष्ट्रध्वजाची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे.
२०२२ मध्ये २३ कोटी नागरिकांनी घरावर प्रत्यक्ष तिरंगा फडकविला होता. या उपक्रमात टपाल विभागाने मोठे योगदान दिले. यावर्षीही देशभक्तीची हीच भावना समोर ठेवून भारत सरकारने १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्याचे निश्चित केले आहे. www.epostoffice.gov.in या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजाची खरेदी करता येणार आहे.
सेल्फी काढून अपलोड करता येणार फोटो…
राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या या कार्यक्रमाशी नागरिक जोडले जावेत, या उद्देशाने टपाल कार्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. नागरिकांना त्यांच्या घरावर, तसेच कार्यालयांवर फडकवलेल्या राष्ट्रध्वजासह सेल्फी फोटो #indiapost4Tiranga, #HarDilTiranga. #HarGhar Tiranga या हॅशटॅगसह समाज माध्यमांवर अपलोड करता येईल.
तिरंग्यासाठी जवळच्या पोस्टात संपर्क साधा…
हर घर तिरंगा २.० अंतर्गत पोस्ट विभाग भारताचा राष्ट्रध्वज पुरवत आहे.
राष्ट्रध्वजाचा आकार २० इंच x ३० इंच (ध्वज खांबाशिवाय) आहे. हा ध्वज आपण आपल्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमधून २५ रुपयांत प्राप्त करू शकता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम