अंमळनेर येथे ए आय एम आय एम पक्ष प्रवेश सोहळा व मार्गदर्शन शिबीर

बातमी शेअर करा...

शहरातून शेकडो युवकांनी केला प्रवेश
अमळनेर(आबिद शेख)अमळनेर शहरातील कसाली मोहल्ला येथील आखाडा मकान जवळील चौकात नुकतेच ए आय एम आय एम पक्षाचे जळगांव जिल्हाध्यक्ष यांच्या मुख्य उपस्थितीत पक्ष प्रवेश सोहळा व मार्गदर्शन शिबिर संपन्न झाले तसेच याप्रसंगी आगामी नगरपरिषद निवडणुकीत पक्षाच्या वतीने निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवारांशी चर्चा ही करण्यात आली
शहरातील कसाली मोहल्ला येथे ए आय एम आय एम चे जिल्हाध्यक्ष अहेमद सर यांच्या अध्यक्षतेखाली , मार्गदर्शन शिबिर व पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी जिल्हाध्यक्ष यांनी सांगितले की अमळनेर शहरातील प्रत्येक वार्डात पक्षाच्या शाखा उघडण्यात येईल आणि लवकरच या ठिकाणी खासदार इमितियाज जलील,मा आमदार वारिस पठाण, सय्यद मोईन , डॉ खालिद परवेज़ सह आदि मान्यवर च्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेण्यात येईल जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते मुस्लिम समाजाचे वरिष्ठ सामाजिक व राजकीय क्षेत्रात सतत कार्यरत असणारे २०० वरिष्ठ व तरूणांनी ए आय एम आय एम पक्षात प्रवेश केले यावेळी पक्षाचे जळगांव जिल्हा अध्यक्ष अहेमद सर, जिल्हा सचिव सईद शेख,सह सचिव मोईन काकर, इम्रान शेख,आदि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाला यशस्वीतेसाठी अमळनेर शहराध्यक्ष हाजी सईद शेख, उपाध्यक्ष कलीम शेख, उपाध्यक्ष अल्तमश शेख, सचिव आकिब अली , अल्ताफ रजा, साजिद अली, मोहसीन बेलदार ,गणेश‌ भऊ ,मुस्ताकीम शेख सह आदि उपस्थित होते

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम