महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण
दै. बातमीदार २९ ऑगस्ट २०२२। महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय गोदाम परिसरात वृक्षारोपण.
गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठानचा वृक्षसंवर्धन एक सृजनशील उपक्रम
महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागातर्फे व गांधी रिसर्च फाऊंडेशन, मराठी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळपास 200 च्यावर झाडांची लागवड करण्यात आली. यावेळी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा उपस्थितीत सर्वांनी घेतली.
जैवविविधता जपता यावी यासाठी हरित शहर ही संकल्पना घेऊन गांधी रिसर्च फाऊंडेशन व मराठी प्रतिष्ठान यांनी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि. च्या सहकार्यातून वृक्षसंवर्धनाचा एक सृजनशील उपक्रम सूरू केला आहे. यात ठिकठिकाणी झाडे लावून त्याचे संवर्धनाची जबाबदारी लोकसहभागातून जळगावकर घेत आहे. वृक्षारोपणाचा उपक्रमात महाराष्ट्र राज्य वखार महामंडाळाच्या शासकिय अन्नधान्य साठवणूक विभागाचे साठा अधिक्षक (स्टोरेज सुपरिटेंडन्ड) के. एन. पाटील यांच्यासह सहकाऱ्यांनी सहभाग घेतला. राज्य वखार महामंडळाच्या गोदाम परिसरात आज वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी जैन इरिगेशनचे अनिल जोशी, शालीग्राम राणे, देवेंद्र पाटील, राजेंद्र माळी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सुधीर पाटील, मराठी प्रतिष्ठानचे विजयकुमार वाणी, शासकीय अन्नधान्य साठवणूक विभागाचे ज्यूनिअर साठा अधिक्षक एम. आर. ढाके, भांडारपाल ए. आर. मेढे, अव्वल महसुल कारकून अयाज शेख उपस्थित होते.
यावेळी सुधीर पाटील यांनी फाऊंडेशनच्या उपक्रमाविषयी सांगितले. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी वृक्षलागवडीसह संवर्धनाचे महत्त्व पटवून सांगितले. यावेळी विजयकुमार वाणी यांनी आपल्या जीवनात झाडांना खूप महत्त्व असून ऑक्सिजन देणारे झाडे किती मौल्यवान असतात हे सांगत ती जोपासली गेली पाहिजे असे आवाहन केले. गांधी रिसर्च फाऊंडेशनसह जैन इरिगेशनतर्फे झाडे लावण्यासाठी सहकार्य केले जाईल असे अनिल जोशी म्हणाले. यशस्वीतेसाठी शासकीय अन्नधान्य विभागातील निलेश पाटील, योगेश पाटील, धनराज बाविस्कर, विकास चौधरी, आकाश चौधरी, सतिष पाटील, पवन चौधरी यांनी सहकार्य केले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम