नाटककार प्राजक्त देशमुखचा अपघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ फेब्रुवारी २०२३ । मराठी मनोरंजन विश्वातील संगीत देवबाभळी या गाजलेल्या आणि लोकप्रिय नाटकाचा नाटककार प्राजक्त देशमुख याचा अपघात झाला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेल्या या अपघातामध्ये तो गंभीर जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

प्राजक्तनं सोशल मीडियावर ट्विट करुन ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. त्याच्या अपघाताची बातमी ऐकून चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबई-नाशिक महामार्गावर झालेला हा अपघात एका अवजड वाहनाच्या बेजबाबदार कृतीमुळे झाल्याचे प्राजक्तनं म्हटले आहे. त्याच्या त्या ट्विटनंतर शेकडो चाहत्यांनी त्याच्याप्रती काळजी व्यक्त केली आहे. नाशिक मुंबई हायवे वरुन धावणा-या अवजड वाहने बेशिस्तीने चालतात.भिवंडी फाट्या अलिकडे एका ट्रकने सिमेटचा डिवायडर ब्लॅाक उडवला आणि तो माझ्या गाडीवर आदळला. थोडक्यात बचावलो.मी सुखरुप आहे.परंतू या हायवेला कुणी वाली आहे का? की केवळ स्पिडगन लाऊन दंडाच्या पावत्या ठोकणे इतकंच यांचं काम. असे त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

 

प्राजक्तविषयी आणखी सांगायचे झाल्यास तो सध्याच्या गाजलेल्या संगीत देवबाभळी या नाटकाचा नाटककार आहे. त्याच्या या नाटकावर कित्येक पुरस्काराचा वर्षाव झाला. त्याला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. 2017 मध्ये आलेल्या ‘देवबाभळी’ या नाटकाला साहित्य अकादमीच्या युवा पुरस्काराने गौरवण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम