पंतप्रधान मोदींनी घुसखोरी रोखली ; गृहमंत्री अमित शाह

बातमी शेअर करा...

बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घुसखोरी रोखली व जम्मू-काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्याचे धाडस दाखवले. परंतु, हे काम काँग्रेस किंवा त्यांची इंडिया आघाडी करून दाखवू शकत नाही, अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी केली आहे.

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचारार्थ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धार जिल्ह्यातील मनवर येथे जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस व इतर विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. कलम ३७० रद्द केल्यामुळे जम्मू-काश्मिरात रक्तपात घडेल, असे वक्तव्य काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केले. पण, मोदींनी कलम ३७० ला केराची टोपली दाखवणे व घुसखोरी रोखण्याचे काम केले. आता जनतेनेच सांगावे की, घुसखोरांना रोखण्याची गरज आहे की नाही? असा सवाल शाह यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला. काँग्रेसने देशातील संस्कृती नष्ट करण्याचे काम केले. विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन करण्याचा पायंडा काँग्रेसने पाडला. पण, नरेंद्र मोदी यांनी त्याला चाप लावल्याचे अमित शाह यांनी सांगितले. २०१८ सालच्या मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीनंतर कमलनाथ यांचे १५ महिन्यांचे सरकार अस्तित्वात आले. या काळात त्यांनी तीर्थ दर्शन योजनेसह अनेक कल्याणकारी योजना गुंडाळल्या. त्यामुळे यंदा काँग्रेसला मतदान करू नका, असे आवाहन शाह यांनी केले. दरम्यान, मध्यप्रदेशात भाजपचा विजय झाल्यानंतर नागरिकांना तीन वेळा दिवाळी साजरी करण्याची संधी मिळणार आहे. पहिली दिवाळी आज लक्ष्मीपूजनदिनी करावी. निवडणुकीत भाजपने बाजी मारताच ३ डिसेंबरला दुसरी दिवाळी आणि अयोध्येत प्रभू श्रीराम यांचा अभिषेक झाला त्या दिवशी २२ जानेवारीला तिसरी दिवाळी साजरी करण्यात येईल, असे अमित शाह म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम