“कोकण साहित्य रत्न” पुरस्कार-२०२३ ने कवी अशोक लोटणकर सन्मानित
मुंबई : शांताराम गुडेकर | कोकणचे सुपुत्र ज्येष्ठ साहित्यिक कवी अशोक लोटणकर यांना कोकण युवा प्रतिष्ठान चा सन २०२३ चा कोकण साहित्य रत्न पुरस्कार डोंबिवली येथील मराठा हितवर्धक मंडळात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे निवृत्त सचिव श्री.चंद्रकांत माने यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला.यावेळी संस्थेचे पदाधिकारी,तसेच पद्मश्री गजानन माने, राजापूर-लांजा तालुका विकास मंडळाचे अध्यक्ष सुभाष लाड तसेच आमदार राजन साळवी इ.मान्यवर उपस्थित होते.यावेळी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या मान्यवरांना देखील कोकण रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
लोटणकर यांनी साहित्यातील कथा, कविता, ललित गद्य, बाल वाङमय , समीक्षा तसेच अंध मुलांसाठी ब्रेल लिपीतूनही लेखन केले आहे. त्यांची आजवर २० पुस्तके प्रसिध्द झालेली असून अनेक मान्यवर संस्थांचे, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील २८ हून अधिक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.लोटणकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील साखरपा या गावातील असून ते बीईएसटी मुंबईतून “आगार व्यवस्थापक ” या पदावरून सेवा निवृत्त झालेले आहेत.ते अनेक सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राशी संबंधित आहेत.लोटणकर यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल अनेक सामाजिक मंडळ, प्रतिष्ठान, ग्राम विकास मंडळ, विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी त्यांना अभिनंदनसह शुभेच्छा दिल्या आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम