चाकूचा धाक दाखविणाऱ्या ‘खेकडा’ पोलिसांच्या ताब्यात !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १४ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात दोन जणांना चाकूचा धाक दाखवत दोन महागडे मोबाईल लांबविल्याची घटना घडली होती. या गुन्ह्यातील फरार असलेल्या चौथा संशयित आरोपी अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद (२०, रा. सुप्रिम कॉलनी) याला शनिवारी १२ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास शाहू नगरातून एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. अमनवर या पूर्वीच १२ गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ११ जुलै रोजी रात्री १२ वाजता हिमांशू शशिकांत कुटे (२५, रा.महाबळ) व देवेश संजय चव्हाण हे मेहरुण तलावाजवळ बसले होते. तेथे एका दुचाकीवर (क्र. एम एच १९, डीएम ३२७८) चार अनोळखी इसमांनी येऊन चाकुचा धाक दाखवत २९ हजार रुपये किमतीचा एक व दुसरा १० हजार ५०० रुपये किमतीचा असे एकूण दोन मोबाईल बळजबरी घेऊन गेले होते. या वेळी हिमांशू कुटे यांना पाठीवर व मांडीवर चाकू मारुन गंभीर दुखापतदेखील केली होती. या प्रकरणी १३ जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्यात यापूर्वी तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या सोबत असलेला चौथा साथीदार अमन उर्फ खेकडा रशीद सैय्यद हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेर्काडवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी १२ गुन्हे दाखल असून त्याचा शोध सुरु होता. तो शाहू नगर येथे असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार शाहूनगर येथून १२ ऑगस्ट रोजी रात्री त्याला सहायक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सुधीर साळवे, चंद्रकांत पाटील, मुकेश पाटील, मुदस्सर काझी, साईनाथ मुंढे यांनी ताब्यात घेतले. त्यास रविवारी १३ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेता अटक करुन न्या. सुवर्णा कुलकर्णी यांच्या न्यायालयात हजर केले असता अमनची कारागृहात रवानगी करण्यात आली. तपास पोउनि रवींद्र गिरासे, पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम