सावदा येथील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई: नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा...

सावदा शहरातील बस स्थानकाच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सावदा पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सावदा पोलिसांना शहरातील बस स्थानकाच्या मागे पत्र्याच्या शेडमध्ये जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार, शनिवार दिनांक २५ रोजी दुपारी ३ वाजता पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला.

छाप्यामध्ये संजय लक्ष्मण चौधरी (५०, स्वामीनारायण नगर, सावदा), रोहित चंद्रकांत सन्यास (२३, आंबेडकर नगर, सावदा), अस्लम रशीद तडवी (४२, काझीपुरा, सावदा), सुनील धनराज चौधरी (४३, भोईवाडा, सावदा), अशोक प्रल्हाद खुर्दे (विवरा, रावेर), संदीप कोळी (कोचूर), विशाल कोळी (बडा आखाडा, सावदा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

या कारवाईत ११२५० रुपये रोख, चार मोटारसायकली आणि चार मोबाईल असा एकूण २,१२,७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम