जिल्ह्यातील कडधान्याचे उत्पादन वाढवण्याचे आवाहन

जिल्ह्यात कडधान्य उत्पादन वाढवणे गरजेचे - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

बातमी शेअर करा...

जळगाव: दाल मिल ओनर्स असोसिएशन जळगाव, कडधान्य संशोधन केंद्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कृषी विभाग जळगाव, कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव आणि अग्रेरियन कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने 24 मे 2024 रोजी शेतकरी उत्पादक कंपनी (FPC), प्रगतिशील शेतकरी आणि दालमिल धारक यांची “कडधान्य क्षेत्र वाढ” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या कार्यशाळेत कडधान्यांचे आहारातील महत्त्व, जमीन पोत सुधारणा, मिश्र पीक पद्धतीचे फायदे आणि शेतकऱ्यांना जास्त दर मिळणे याबाबत सखोल चर्चा झाली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कडधान्य उत्पादन वाढविण्याचे महत्त्व आणि त्यासाठीचे उपाय मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक दाल मिल ओनर्स असोसिएशनचे संचालक दिनेश राठी यांनी केले. डॉ. सुमेर सिंग राजपूत यांनी कडधान्य उत्पादन तंत्रज्ञानावर मार्गदर्शन केले, तर अनिल भोकरे यांनी उत्पादन आणि विपणनातील अडचणींवर मात करण्याचे उपाय सुचविले.

या कार्यशाळेत अनेक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला शेतकरी यांनी सहभाग घेतला. प्रमुख उपस्थितांमध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी, प्रकल्प संचालक आत्मा श्री चलवदे, प्रकल्प संचालक पोक्रा श्री जाधव, आणि अन्य मान्यवरांचा समावेश होता. कार्यक्रमाचे आयोजन अनिल भोकरे, समाधान पाटील, प्रशांत पाटील यांच्या विशेष सहकार्याने करण्यात आले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम