कॉम्प्रोमाइजचं राजकारण मला शक्य होणार नाही ; पंकजा मुंडे बोलल्या !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ देशात व राज्यात भाजप सत्तेत असतांना सुद्धा राज्यातील भाजप मधील काही नेते भाजपवर नाराज असले तरी ते अजून कुठलीही भूमिका घेत नाही पण ते उघडपणे कार्यक्रमात बोलून दाखवीत आहे. त्यातील एक नेत्या म्हणजे पंकजा मुंडे नाशिक येथे एका कार्यक्रमात त्यांनी बोलून दाखविले आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाले कि, भाजपमध्ये तुम्हाला संधी का मिळत नाही? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा “मला संधी का मिळत नाही, याचं उत्तर मला संधी देणाऱ्यांनी ती का दिली? अन् ज्यांनी संधी दिली नाही दिली त्यांनी का नाही दिली तेच देऊ शकतात. मी त्याचं उत्तर नाही देऊ शकत, ज्या गोष्टी मनात बाळगून मी राजकारणात आले. त्या समाजासाठी काम करण्याची मला जर मुभा नसेल तर कॉम्प्रोमाइजचं राजकारण मला शक्य होणार नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन मिळावं यासाठी नाशिकच्या व्ही प्रोफेशनल्स या संस्थेतर्फे आरोग्य विज्ञान विद्यापीठात करिअरबाबत मार्गदर्शनासाठी विशेष चर्चा सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या चर्चासत्रात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मान्यवरांनी सहभाग घेतला. याच कार्यक्रमात पंकजा मुंडे यांची मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय.

खऱ्या विषयांकडे आपलं ध्यान द्या. खऱ्या विषयांकडे फोकस करा. सध्या वेगवेगळ्या क्षेत्रातली पातळी घसरत चाललीय. सोशल मीडियामुळे अतिरंजित विषयांकडे लक्ष जातंय. तसंच राजकारणातही लोकांच्या मुद्द्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. एखाद्या पक्षाचा नेता दुसऱ्या पक्षातील नेत्यांशी बोलणं. त्यांच्या समारंभात जाणं. बरोबर गाडीत बसणं या गोष्टींना काही अर्थ लावण्याची गरज नाही. शरद पवार सीनियर आहेत. त्यांच्यासोबत जाताना त्यांच्या गाडीत बसणं हा नम्रपणा आहे, असं एका प्रश्नाचं उत्तर देताना पंकजा मुंडे म्हणाल्यात. सध्या राजकारणात होणाऱ्या चिखलफेकीवर पंकजा मुंडे बोलल्या. राजकारणात कुणी कुणावर वैयक्तिक आरोप करू नये, असं मी स्पष्टपणे सांगते, असं त्या म्हणाल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम