Porsche Accident: ताज्या घडामोडी आणि तपशील; अश्विनीच्या आईचा सून्न करणारा सवाल

बातमी शेअर करा...

पुण्यात १९ मे रोजी एक धक्कादायक घटना घडली. एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत दोन जणांना ठोकरले. या दुर्घटनेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत आणि राजकीय आरोपही केले जात आहेत. सध्या या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आईलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर मध्य प्रदेशातून अश्विनी कोस्टाच्या आईने मन सुन्न करणारी प्रतिक्रिया दिली आहे.

लोकसभा निवडणूक निकाल: मतदानोत्तर चाचण्यांच्या अंदाजांचा आढावा

अजित पवारांचे मत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले, “पुणे पोर्श अपघात प्रकरणी राज्य सरकार आणि पोलीस योग्य कारवाई करत आहेत. आम्ही कॅमेरासमोर येत नाही याचा अर्थ आम्ही लपवाछपवी करत आहोत असे नाही. विरोधकांचे आरोप त्यांच्या अधिकारात आहेत, पण घटना घडल्यापासून दोषींवर कारवाई करण्यात आली आहे.”

बापाला आणि आजोबांना अटक

अजित पवार पुढे म्हणाले, “या प्रकरणात ससून रुग्णालयातील डॉक्टरही दोषी आढळले असून, त्यांच्यावरही कारवाई झाली आहे. अल्पवयीन मुलाच्या नावाने कोणाचे रक्ताचे नमुने पुढे करण्यात आले होते, याची चौकशी सुरू आहे. अपघात घडला तेव्हा हसन मुश्रीफ परदेशात होते. ससून रुग्णालय त्यांच्या कक्षेत येते. त्यांनी संबंधितांच्या चौकशीचे आदेश दिले. उत्पादन शुल्क खात्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही आपापल्या खात्याल सूचना दिल्या आहेत. मुलाला, त्याच्या बापाला आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही.”

१९ मेच्या पहाटे काय घडले?

१९ मे रोजी पुण्यात पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श कार चालवत एका अल्पवयीन मुलाने बाईकवरून घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना ठोकरले. या दोघांचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलाला लगेचच अटक करण्यात आली होती, परंतु १५ तासांत त्याला जामीन मिळाला. यामुळे सोशल मीडियावर आणि समाजात संताप व्यक्त झाला. या घटनेचे विविध पडसाद उमटत आहेत. मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे, तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे.

एक्झिट पोल: जळगाव आणि रावेरमध्ये भाजप उमेदवारांची सरशी

अश्विनीच्या आईची प्रतिक्रिया

मध्य प्रदेशातून अश्विनी कोस्टाच्या आईने दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी म्हटले, “आम्ही मध्य प्रदेशात राहतो, पण सरकारतर्फे आमचे कुणीही सांत्वन केले नाही. मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्र सरकारला विनंती करावी की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा. माझी मुलगी आता या जगात नाही, पण इतर कोणत्याही आईला असा अनुभव येऊ नये. धनिकांच्या मुलांनी असा कोणालाही ठोकरू नये. त्यामुळे आमची ही अपेक्षा आहे की आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा.”

या प्रकरणी पुढे काय?

या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तपास योग्य पद्धतीने सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही म्हटले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम