एक्झिट पोल: जळगाव आणि रावेरमध्ये भाजप उमेदवारांची सरशी

बातमी शेअर करा...

जळगाव आणि रावेर या दोन्ही मतदारसंघांत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी होतील असा अंदाज आज जाहीर करण्यात आलेल्या दोन एक्झिट पोलमध्ये व्यक्त झाला आहे.

शेवटच्या टप्प्यातील मतदानानंतर विविध एक्झिट पोल्स समोर आले आहेत. टिव्ही नाईन आणि एबीपी-सी व्होटरच्या अंदाजानुसार, देशात पुन्हा मोदी सरकार सत्तेवर येईल असे दिसते. भाजपला काही राज्यांमध्ये कमी जागा मिळण्याची शक्यता आहे, परंतु अन्य राज्यांमध्ये ते भरून निघेल, असे अंदाज आहेत. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये तीव्र टक्कर होईल असे संकेत आहेत. बहुतांश एक्झिट पोल्सच्या मते, सांगली येथे अपक्ष उमेदवार विशाल पाटील विजयी होतील, तर उर्वरित जागांमध्ये महायुतीला २३ आणि महाविकास आघाडीला २४ जागा मिळतील असे अंदाज आहेत.

जळगावमध्ये भाजपच्या स्मिताताई वाघ आणि रावेरमध्ये भाजपच्या रक्षाताई खडसे विजयी होतील असा अंदाज आहे. दोन्ही जागांवर तीव्र स्पर्धा दिसून आली, तरीही एक्झिट पोल्स भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, हे केवळ अंदाज आहेत आणि अंतिम निकाल ४ जून रोजी दुपारी लागेल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम