कराडमध्ये घरात शक्तिशाली स्फोट; सात जण जखमी

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३ 

कराड येथील मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथील एका घरात बुधवारी सकाळी शक्तिशाली स्फोट झाला. यामध्ये चार दुचाकी वाहनांचे नुकसानही झाले, तर, ७ जण जखमी झाले. हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क काढले जात आहेत. मात्र, पुढील तपासानंतर या स्फोटाचे कारण समोर येईल, असे अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, स्थानिक पोलिसासह पुण्याचे अतिरेकी विरोधी, फॉरेन्सिक लॅब, साताऱ्याचे बॉम्ब शोध व नाश पथक, श्वानपथक त्याचा तपास करत आहेत. शरीफ मुबारक मुल्ला (३६), सुलताना शरीफ मुल्ला (३२), जोया शरीफ मुल्ला (१०), राहत शरीफ मुल्ला (७), यांच्यासह अशोक दिनकर पवार (५४), सुनीता अशोक पवार (४५), दत्तात्रय बंडू खिलारे (८०, सर्व रा. शांतिनगर, मुजावर कॉलनी, कराड ) अशी या स्फोटातील जखमींची नावे आहेत. जखमींना येथील कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बुधवारी सर्वजण साखरझोपेत असताना सात वाजण्याच्या सुमारास मुजावर कॉलनी येथील शांतीनगर येथे अचानक एका घरामध्ये भीषण स्फोट झाला. भीषण स्फोटाच्या आवाजाने मुजावर कॉलनीसह आजूबाजूच्या कॉलनी व स्टेडियम परिसर हादरून गेला. त्या स्फोटाची तीव्रता एवढी मोठी होती की, ज्या घरात स्फोट झाला त्या घराची सिमेंट काँक्रीटची भिंत फुटून समोरच्या घरावर आदळली. स्फोट झालेल्या घरातील चौघे भाजल्याने जखमी झाले. त्यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. त्या शेजारीच तीन महिन्यांपूर्वी बांधलेल्या सिमेंट काँक्रीटच्या इमारतीचीही भिंत कोसळली. त्या खाली सापडलेले तिघे जखमी आहेत. स्फोट झालेल्या घरामागे मातीच्या घराची भिंत कोसळून त्यांचे स्वयंपाकघर उद्ध्वस्त झालेद्या घटनेत सात जण जखमी आहेत तर जवळपास पाच घरांचे २० लाखांहून जास्त नुकसान झाले आहे. भिंतीखाली चार दुचाकी गाडल्या जाऊन यांचेही नुकसान झाले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम