बर्निंग ट्रेनचा थरार : पातालकोट एक्स्प्रेसचे दोन डबे पेटले !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २६ ऑक्टोबर २०२३

गेल्या काही वर्षापासून सुरक्षित मानल्या जाणाऱ्या रेल्वेत अनेक धक्कादायक घटना घडत असल्याने नेहमीच चर्चेत येत असलेली भारतीय रेल्वेला पुन्हा एकदा आग्रा रेल्वे स्थानकानजीक पातालकोट एक्स्प्रेसचे दोन डबे पेटल्याने बुधवारी बर्निंग ट्रेनचा थरार पाहायला मिळाला. आगीत सापडून २ प्रवासी भाजले असले तरी सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

पातालकोट एक्स्प्रेस पंजाबच्या फिरोजपुर छावणी ते मध्यप्रदेशच्या सिवनी दरम्यान धावते. नेहमी प्रमाणे रेल्वेने आग्रा स्थानक सोडल्यानंतर पावणेचार वाजेच्या सुमारास इंजीनजवळच्या तिसऱ्या व चौथ्या डब्यात आगीचा भडका उडाला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर रेल्वे थांबवण्यात आली. यानंतर राबवलेल्या बचाव अभियानादरम्यान जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी दाखल अग्निशमन दलाच्या पाच पथकांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसल्याची माहिती आग्रा रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी प्रशस्ती श्रीवास्तव यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम