वलवाडी विकासो चेअरमन पदी प्रभाकर पाटील तर व्हा. चेअरमन पदी नारायण पाटील यांची बिनविरोध निवड.

advt office
बातमी शेअर करा...

भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील वलवाडी येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या नवनिर्वाचीत चेअरमन पदी प्रभाकर (नागो) शामराव पाटील तर नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन पदी नारायण भगवान पाटील या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली. ही निवडणुक निर्णय अधिकारी जितेंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. नवनिर्वाचीत चेअरमन प्रभाकर शामराव पाटील व नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन नारायण भगवान पाटील या दोघांचा संचालक मंडळामार्फत सत्कार करण्यात आला. लोटन राजाराम पाटील यांनी ठरल्याप्रमाणे चेअरमन पदाचा व रेखाबाई शंकर पाटील यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ही रिक्त जागेसाठी नविन चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाचा निवडीचा कार्यक्रम झाला. यावेळी संचालक प्रकाश पाटील, साहेबराव पाटील, निळकंठ पाटील ,भीमराव पाटील, शिवाजी पाटील ,रामदास सोनवणे ज्योताबाई पाटील आदि संचालक, तसेच माजी उपसरपंच शामराव पाटील, माजी सरपंच बाबाजी ओंकार पाटील, माजी सरपंच विकास मुरलीधर पाटील, ग्राम.सदस्य संजय पाटील, माजी चेअरमन विकासो प्रवीण पाटील व नागरीक उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन भडगाव सहाय्यक निबंधक कार्यालयाचे जितेंद्र जोशी यांनी निवडीचे कामकाज पाहीले. त्यांना संस्थेचे सचिव चंद्रकांत पाटील यांनी सहकार्य केले. सेवक सुनील पाटील, या कर्मचार्यांनी विशेष परीश्रम घेतले.

नवनिर्वाचीत चेअरमन प्रभाकर पाटील तर नवनिर्वाचीत व्हाईस चेअरमन भगवान पाटील या दोघांच्या सत्काराचा कार्यक्रम नागरीकांनी वलवाडी वि.का. सोसायटी मध्ये आयोजीत केला होता. यावेळी चेअरमन प्रभाकर पाटील पाटील व व्हाईस चेअरमन नारायण पाटील यांचा सत्कार उपस्थित नागरीकांनी केला. तसेच भडगावचे पञकार भास्कर (बापूराव )शार्दुल, हिलाल नेरपगार, यांनीही नवनिर्वाचीत पदाधिकार्यांचा सत्कार केला. यावेळी सर्व संचालक मंडळ, योगेश पाटील धनराज बागुल यांचेसह नागरीक हजर होते. चंद्रकांत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम