मला अनेक स्टार्सचे चित्रपट हिसकावयाचे ; जान्हवी कपूर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ जुलै २०२३ ।  बॉलीवूड इंडस्ट्रीतील जान्हवी कपूर एक लोकप्रिय अभिनेत्री असून ती नेहमीच सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. बॉलीवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी म्हणून जान्हवी सगळ्यांना माहिती आहे. पण गेल्या काही वर्षांपासून जान्हवीनं तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या जान्हवीचा आणि वरुण धवनचा ‘बावल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. यावेळी एका मुलाखतीदरम्यान तिने मोठा खुलासा केला आहे.

जान्हवी म्हणाली की, बॉलीवूडमधील सर्व स्टार्स एकमेकांचे चांगले मित्र असल्याचा दावा करतात, तर असे देखील होऊ शकते की जेव्हा एखाद्या स्टारला चांगला चित्रपट मिळतो तेव्हा दुसऱ्या स्टारला तो पचण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागतो. याबाबत जान्हवी कपूरने खुलासा केला आहे. यावेळी जान्हवीने तिला अनेक चित्रपटांमध्ये काम करण्याची इच्छा असल्याचे देखील बोलून दाखवले. पुढे ती म्हणाली, “मला काम हवे आहे, मला अनेक स्टार्सचे चित्रपट हिसकावून घ्यावेसे वाटतात. वेगवेगळे अनुभव स्टार्सला मिळतात, त्यांना नवीन दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळते. मला वाटते की त्याचा मला खूप राग येतो.” दरम्यान, वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा बावल हा चित्रपट 21 जुलै रोजी OTT वर रिलीज होत आहे. बावल हा चित्रपट Amazon Prime वर पाहता येईल. या चित्रपटाची निर्मिती सुप्रसिद्ध दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी केली आहे. दंगल सारख्या चित्रपटातून नितेश तिवारी यांनी बॉलीवूडमध्ये आपली प्रतिभा साजरी केली.नितेश तिवारीच्या छिछोरे या चित्रपटालाही बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला. बावलची निर्मिती साजिद नाडियादवाला यांच्या नाडियाडवाला ग्रॅंडसन एंटरटेनमेंटने अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेशच्या अर्थस्काय पिक्चर्स यांच्या संयुक्त विद्यमाने केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम