गर्भवती अभिनेत्रीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

देशातील मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून अनेक धक्कादायक घटना समोर येवू लागलेल्या असतांना आता नुकतेच मल्याळम मालिकांमध्ये सहकलाकाराची भूमिका बजावणाऱ्या तसेच आठ महिन्यांची गर्भवती असलेली अभिनेत्री डॉ. प्रिया यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हृदयविकारामुळे मंगळवारी अभिनेत्रीचा मृत्यू झाला असला तरी त्यांच्या बाळाला वाचवण्यात डॉक्टरांना यश आले.

वेळेपूर्वीच जन्मलेल्या या अर्भकावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरू असून त्याला व्हेंटिलेटरवर ठेवल्याची माहिती अभिनेत्रीच्या सहकाऱ्याने बुधवारी दिली. अभिनेता किशोर सत्या यांनी सोशल माध्यमाद्वारे आपल्या चाहत्यांना ३५ वर्षीय अभिनेत्रीच्या निधनाची दुःखद बातमी दिली. डॉ. प्रिया नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला. प्रिया यांना कोणतीही आरोग्यविषयक समस्या नव्हती, असे सत्या यांनी स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम