विद्यार्थ्यांनो अभ्यासाला लागा : दहावी व बारावीचे वेळापत्रक जाहीर

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ नोव्हेबर २०२३

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावी व दहावीच्या लेखी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर झाले आहे. बारावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत, तर दहावीची लेखी परीक्षा १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळाने यापूर्वी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले होते. यानंतर हे वेळापत्रक अंतिम करण्यात आले आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा १० फेब्रुवारी ते २९ फेब्रुवारी २०२४ व बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. मंडळाकडून दिनांकनिहाय सविस्तर वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर २ नोव्हेंबरपासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे.बारावीच्या माहिती तंत्रज्ञान व सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा २० ते २३ मार्च २०२४ या कालावधीत होणार आहे. विद्याथ्यांनी छापील वेळापत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी व परीक्षेस प्रविष्ठ व्हावे. अन्य संकेतस्थळांवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले, तसेच सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये, अशी सूचना मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम