वडिलांना पाहिल्यावर काय झाले ; गौतमीने दिली रडून प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २४ सप्टेंबर २०२३ | राज्यात सध्या प्रत्येक तरुणाच्या मोबाईलमध्ये गौतमी पाटीलचे फोटो असतील असे होवू शकत नाही कारण गेल्या काही वर्षात मोठ्या चर्चेत आलेली गौतमी पाटीलने आपले अनुभव कथन करताना डोळ्यातून पाणी आले आहे. पण इथपर्यंत झालेला तिचा प्रवास फार सोपा नव्हता. अनेक कष्ट घ्यावे लागलेत. तिला आणि तिच्या आईला खूप हाल सहन करावे लागले, तेव्हा कुठे ती यशाच्या शिखरापर्यंत पोहोचली. तेही वडिलांची काडीचीही साथ नसताना. किंबहुना तिला वडिलांचा सहवासच लाभला नाही. असं काय घडलं? काय सांगितलं गौतमीने?

प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील हिने एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिच्या खासगी आयुष्यावर प्रकाश टाकला. तिचं बालपण, तिचा संघर्ष आणि तिच्या डान्सच्या आवडीवरही ती भरभरून बोलली. यावेळी ती कधी रडली तर कधी दिलखुलास हसली. वडिलांच्या गावचं काहीच माहीत नाही. जळगाव जिल्ह्यातील चोपडा हे वडिलांचं गाव. पण चोपड्याशी माझा कधीच संबंध आला नाही. सर्व बालपण आईच्या माहेरी सिंदखेड्यात गेलं. तिथेच वाढले. तिथेच शिकले, असं गौतमी पाटील यांनी सांगितलं.

माझं दहावी पर्यंत शिक्षण झालं. आठवीपर्यंत सिंदखेड्यात होते. दहावीला मी पुण्यात आले. माझं कुटुंब म्हणजे आई आणि मीच. सोबत आईचे वडील म्हणजे माझे आजोबा. मी आठवीला गेले तेव्हा पहिल्यांदाच वडिलांना पाहिलं. त्याला कारणही घडलं. आईच्या वडिलांनी म्हणजे आजोबांनी आम्हाला सांभाळलं होतं. मी आठवी झाले. त्यानंतर मला पुण्याला शिकायला जायचं होतं. आजोबांचं वय झालं होतं. तेव्हा आम्हाला कोण सांभाळणार? असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा वडिलांना बोलवायचं ठरलं आणि मग आयुष्यात पहिल्यांदाच मी वडिलांना भेटले, असं तिने सांगितलं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम