शाकाहारी थाळींच्या किमती घसरल्या !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ६ ऑक्टोबर २०२३ | टोमॅटोच्या घसरलेल्या किमतींमुळे सप्टेंबरमध्ये भारतात शाकाहारी थाळींच्या दरात मासिक आधारावर घट झाली आहे. गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

क्रिसिल मार्केट इंटेलिजेंस अँड अॅनालिटिक्सच्या रोटी चावल रेट (आरआरआर) नुसार, जेवणाच्या किमतीचे मासिक निर्देशक, शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या किमती मागील महिन्याच्या तुलनेत सप्टेंबरमध्ये अनुक्रमे १७ टक्के आणि नऊ टक्क्यांनी कमी झाल्या. सप्टेंबरमध्ये टोमॅटोचे दर मासिक आधारावर ६२ टक्क्यांनी घसरून ३९ रुपये किलोवर आले आहेत. टोमॅटोचा भाव ऑगस्टमध्ये १०२ रुपये किलो होता. थाळीच्या किमती घसरण्यामागे हे एक प्रमुख कारण आहे. अहवालानुसार, वार्षिक आधारावर सप्टेंबरमध्ये शाकाहारी थाळीच्या किमतीत एक टक्का घसरण झाली आहे. त्याचवेळी, गहू आणि पाम तेलाच्या चढ्या किमतींमुळे, मांसाहारी थाळीच्या किमतीत किरकोळ ०.६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अहवालात असे म्हटले आहे की, सप्टेंबरमध्ये मासिक आधारावर कांद्याच्या किमती १२ टक्क्यांनी वाढल्या आहेत आणि २०२३ मध्ये खरीप उत्पादन कमी होण्याची अपेक्षा असल्याने या पातळीवर स्थिर राहण्याची शक्यताआहे. शाकाहारी आणि मांसाहारी थाळींच्या एकूण किमतीमध्ये इंधनाच्या किमती अनुक्रमे १४ टक्के आणि आठ टक्के योगदान देतात. १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत १,१०३ रुपयांवरून ९०३ रुपयांपर्यंत घसरल्याने सप्टेंबरमध्ये त्यात अनुक्रमे १८ टक्क्यांनी घट झाली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम