
जळगावात पालकमंत्री पाटलांना मोठा धक्का : महाविकास आघाडीचा विजय !
दै. बातमीदार । ३० एप्रिल २०२३ । जिल्ह्यातील सर्वात महत्वाची मानली जाणारी जळगाव बाजार समिती महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला आहे तर महायुतीचा दारूण पराभव झाल्याचे चित्र समोर आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे. भाजप शिंदे गटाला सात जागा मिळाल्या तर एक अपक्ष उमेदवार निवडून आला.
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी हा पराभव मोठा धक्का मानला जात आहे. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत गुलाबराव देवकर यांनी तालुक्यातील दबदबा सिद्ध केला आहे.
मविआ ११, युती ६, अपक्ष १ – सोसायटी 5 जागा महविकास – 2 जागा भाजप – राखीव सोसायटी- 3 जागा महा विकास – 1 जागा भाजप – ग्राम पंचायत – 1 जागा भाजप- 2 महा विकास – 1 अपक्ष – व्यापारी – 1 जागा महा विकास – 1 जागा भाजप – हमाल मापाडी – 1 जागा भाजप

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम