पंतप्रधान मोदींनी साजरी केली सैनिकांसोबत दिवाळी !
बातमीदार | १२ नोव्हेबर २०२३
देशभरात दिवाळीचा उत्साहात साजरी होत असून देशाच्या सीमांचे रक्षण करण्यात गुंतलेल्या सैनिकांना कर्तव्यावर असतांना घरी जाता येत नाही. अशा परिस्थितीत, त्यांना त्यांच्या कुटुंबाची उणीव भासू नये म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी देशाच्या विविध सीमा भागात सैनिकांसोबत दिवाळी साजरी करतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या जवानांसोबत दिवाळी साजरी केली. नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशमध्ये गेले होते. सीमावर्ती भागात लेपचा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलाच्या जवानांची भेट घेतली.
नरेंद्र मोदी म्हणाले, शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचलो आहे. यावेळी पीएम मोदी आर्मी जॅकेट आणि कॅपमध्ये दिसले. नरेंद्र मोदी म्हणाले, हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे आमच्या धाडसी सुरक्षा दलांसोबत दिवाळी घालवणे हा अभिमानाने भरलेला अनुभव आहे. आपल्या कुटुंबापासून दूर, आपल्या राष्ट्राचे हे रक्षक आपल्या समर्पणाने आपले जीवन उजळून टाकतात. “आपल्या सुरक्षा दलांचे धैर्य अतूट आहे. सर्वात कठीण प्रदेशात, त्यांच्या प्रियजनांपासून दूर, त्यांचे त्याग आणि समर्पण आपल्याला सुरक्षित ठेवतात. शौर्य आणि प्रतिकूल परिस्थितीत लढणाऱ्या वीरांचे भारत सदैव ऋणी राहील,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम