पंतप्रधान मोदींनी तरुणांना दिली दिवाळीपूर्वी मोठी भेट !
बातमीदार | १ नोव्हेबर २०२३
देशातील प्रत्येक तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी मोठी भेट दिली आहे. पंतप्रधानांनी ‘मेरा युवा भारत पोर्टल’ लाँच केलं आहे. त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंगळवारी हे पोर्टल लाँच केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 ऑक्टोबरला दिल्लीतील मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात ‘मेरा युवा भारत पोर्टल’ व्हर्च्यूअली लाँच केलं. ‘माती मेरा देश’ मोहिमेचा समारोप समारंभाच्या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी नवी दिल्लीतील कर्तव्य पथ येथे अमृत कलशात माती अर्पण केली.
‘मेरा युवा भारत’बाबत पंतप्रधान रविवारी ‘मन की बात’ कार्यक्रमात म्हणाले होते की, ‘मेरा युवा भारत’ भारतातील तरुणांना विविध राष्ट्र निर्माण कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीत भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.
मेरी माती मेरा देश-अमृत कलश यात्रेच्या समारोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “जेव्हा हेतू चांगला असतो आणि राष्ट्राची भावना प्रथम सर्वोपरी असते, तेव्हाच परिणाम सर्वोत्तम असतात. ‘आझादी का अमृत महोत्सव’ दरम्यान, भारताने अनेक ऐतिहासिक कामगिरी केली. ‘आझादी का अमृत महोत्सवा’ दरम्यान देशाने राजपथ ते कर्तव्यपथ हे अंतर कापलं”
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम