पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर ; निवडणुकीची चाचपणी सुरु ?

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३

देशात आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांची जोरदार कामे सुरु असतांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे लोकसभेतून निवडणूक लढविणार अशा चर्चा सुरु असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकताच पुणे दौरा निश्चित झाला आहे. त्यांचा दोन महिन्यात हा दुसरा दौरा असल्याने आता त्या चर्चेला बळ मिळू लागले आहे. पुणे शहरालगतच्या लोहगाव विमानतळावर नवीन टर्मिनल उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. या टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाच ऑक्टोबर रोजी होणार आहे. नवीन टर्मिनलची चाचणी यशस्वी झाली आहे. यामुळे आता हे टर्मिनल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

हे टर्मिनल उभारण्यासाठी ५२५ कोटी रुपये खर्च आला आहे. विमानतळावरील या टर्मिनलवर टेकऑफ आणि लॅण्डींगसाठी नव्या सुविधा विकसित केल्या आहेत. टर्मिनलवर एरोब्रिज तयार केले गेले आहे. सध्या पुणे विमानतळावरून ९० विमाने रोज जात आहे. त्यानंतर नवीन टर्मिनल सुरू झाल्यावर १२० विमाने रोज टेक ऑफ आणि लॅण्डींग करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यावेळी मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार दिला होता. त्यावेळी पुणे मेट्रोच्या दोन मार्गांचे उद्घाटन मोदी यांनी केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन महिन्यांनंतर ५ ऑक्टोबर रोजी पुणे शहरात येत आहेत. दरम्यान, राज्यात भाजपचे मिशन ४५ सुरू असताना पुणे जिल्ह्यात भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे दौरे वाढले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी १ ऑगस्ट रोजी पुणे शहरात आले होते. त्यानंतर गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डाही पुण्यात आले. नुकतीच संघाची राष्ट्रीय बैठक पुणे शहरात झाली. या सर्व पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी पुन्हा पुणे दौऱ्यावर येणार आहेत. अवघ्या दोन महिन्यांनंतर मोदी यांची ही पुणे शहराची दुसरी भेट आहे. त्यामुळे ते सर्वाधिक भेट दिलेले पंतप्रधान बनले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम