राज्याचा अपमान ‘दिल्लीश्वर’ करताहेत ; सुप्रिया सुळे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३

राज्याच्या राजकारणात शरद पवारांची राष्ट्रवादीतील अनेक नेते केद्र व राज्यातील सरकारवर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे गेल्या काही दिवसापासून दिसून येत असतांना नुकतेच सुप्रिया सुळे यांनी नागपुरात पत्रकार परिषद घेत भाजपवर टीका केली आहे.

नागपूर दौऱ्यावर आल्या तेव्हा त्यांनी भंडारा, गोंदिया व नागपूर जिल्ह्यांचा स्वागत लॉनमध्ये आढावा घेतला. कार्यकर्त्यांना संबोधित केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाराष्ट्रात मराठीशी नाळ जुळलेले शिवसेना व राष्ट्रवादी हे दोन पक्ष होते. वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी मातीतून आपला पक्ष उभा केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांनी निर्माण केला. हे पक्ष फोडण्यात दिल्लीचे ‘अदृश्य हात’ जबाबदार आहेत, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. महाराष्ट्राचे क्षणोक्षणी खच्चीकरण व राज्याचा अपमान ‘दिल्लीश्वर’ करत आहेत. जो व्यक्ती पाच वर्षे मुख्यमंत्री होता त्याला उपमुख्यमंत्री व नंतर सेकंड उपमुख्यमंत्री करून या अदृश्य हाताने महाराष्ट्राचा मोठा अपमान केला आहे.

विदर्भात राष्ट्रवादीला जे काही यश मिळाले ते फक्त प्रफुल्ल पटेल यांच्यामुळेच, जे काही अपयश मिळाले ते माझ्यामुळेच, असे सांगून त्यांनी ‘भाईजींना’ आपल्या शैलीत टोला लगावला. आपली वैयक्तिक लढाई नाही. भाजपशी वैचारिक लढाई आहे. मला हुकूमशाही मान्य नाही. हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी मी व माझा पक्ष सज्ज आहे, असे त्या म्हणाल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम