नवीन संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दंडवत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ मे २०२३ ।  देशात सर्वात मोठ्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटनासाठी हवन-पूजन सुरू झाले आहे. पूजेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सभापती ओम बिर्ला उपस्थित आहेत. चेन्नईहून आलेल्या धर्मपुरम अधनम मठाच्या 21 संतांनी सेंगोल पंतप्रधान मोदींना सुपूर्द केले. पंतप्रधानांनी सेंगोलला दंडवत नमस्कार करून संतांचे आशीर्वाद घेतले. यानंतर पंतप्रधान मोदींनी मंत्रोच्चारात स्पीकरच्या खुर्चीजवळ सेंगोल स्थापित केले. संसदेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या श्रमयोगींचा पंतप्रधान मोदींनी गौरव केला. सध्या सर्व धर्मीयांची प्रार्थना सभा झाली.

BJP add

PM मोदी सकाळी 7.30 वाजता संसदेत पोहोचले आणि त्यांनी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधींना नमन केले. यानंतर हवन झाले आणि सेंगोल स्वीकारत पीएम मोदींनी ऋषी-मुनींचे आशीर्वाद घेतले. उद्घाटनापूर्वी पंतप्रधानांनी संसद भवनाच्या व्हिडिओसाठी व्हॉईस ओव्हर देण्याचे आवाहन सर्वांना केले. यानंतर शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अनुपम खेर या सेलिब्रिटींनी या व्हिडिओमध्ये आपला आवाज दिला आहे. 20 विरोधी पक्षांनी संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार टाकला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम