मराठवाड्यावर आश्वासनांचा पडला पाऊस ; राज ठाकरेंचे ट्विट व्हायरल !

advt office
बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ सप्टेंबर २०२३ 

राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवारांचे मंत्रीमंडळाची तब्बल सात वर्षानंतर छत्रपती संभाजीनगर दोन दिवसापासून बैठक सुरु आहे. या बैठकीनंतर राज्य सरकारने मराठवाड्यावर आश्वासनांचा पाऊस पडला. तसेच मराठवाड्यासाठी 45 हजार कोटींची विकासकामे करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. सरकारच्या या पॅकेजवर विरोधकांकडून टीका होत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या पॅकेजची हवाच काढून टाकली आहे. राज ठाकरे यांनी ट्विट करून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे.

अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही. हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

निर्धार करण्याचा दिवस
तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता. याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे, असंही राज यांनी म्हटलं आहे.

हा अखंतडतेसाठीचा लढा
आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा. कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं राज ठाकरे म्हणाले.

धडा शिकवा
मी मागच्या वेळेस म्हणलं होतं तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असं आवाहन करतानाच राज ठाकरे यांनी मराठवाड्यातील जनतेलामहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम