जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ९ संघटनांचे बोंबाबोंब आंदोलन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १० मार्च २०२३ । बहुजन समाजातील अन्य अधिकारी व कर्मचारी यांंच्याशी व डॉ.विनायक काळे (अधिष्ठाता,बी.जे.मेडिकल कॉलेज व ससुन हॉस्पीटल,पुणे) आणि सामाजिक व जातीय द्वेष भावनेतुन महाराष्ट्र शासनाकडुन होत असलेल्या अन्यायाविरोधात दुसऱ्या टप्प्यातील “बोंबाबोंब आंदोलन” ३५८ तालुक्यात करण्यात आले.त्याचाच एक भाग म्हणुन जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर हे आंदोलन किशोर नरवाडे (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

१३/१/२०२३ च्या शासन आदेशान्वये डॉ.विनायक काळे यांची बदली डीन पदावरुन संचालक-प्राध्यापक , महाराष्ट्र मानसिक संस्था,पुणे या गैरसंवैधानिक कनिष्ठ पदावर करण्यात आली. डॉ.विनायक काळे हे मागील ९ महिन्यांपासून डीन या पदावर कार्यरत होते.ते बदलीपात्र नसतानाही कोणत्याही विशेष कारणाशिवाय कनिष्ठ पदावर बदली करणे हे पुर्णतः नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. डॉ.संजीव ठाकुर हे बदलीस पात्र होते.यापुर्वी डॉ.ठाकुर यांची बदली आदेश क्र.शा.आ.क्र.आस्थाम-१२२०/प्र.क्र.-६/२०२०/वैसेवा१/दि.८/४/२०२२ अन्वये औरंगाबाद येथे करण्यात आली परंतु ते औरंगाबाद येथे रुजु झाले नाहीत.डॉ.ठाकुर यांची बदली सोलापुर येथे करण्यात आली.डॉ.ठाकुर यांच्या पसंतीच्या ठिकाणी पुणे येथे बदली करुन शासन त्यांच्यावर वारंवार मेहरबानी का करत आहे? डॉ. ठाकुर यांची बदली रिक्त असलेल्या पदावर न करता त्यांची बदली पुणे येथे करण्यात आली.डॉ.काळे हे अनु.जातीचे असल्याने त्यांची सामाजिक व जातीय द्वेषातुन आणि डॉ.संजीव ठाकुर यांना गैरमार्गाने फायदा पोहचवण्यासाठी डॉ.काळे यांची बदली पदावनत करुन करण्यात आली आहे. शासनाचे हे अनु.जाती-जमाती, ओबीसी ‘भटके विमुक्त या समस्त बहुजन समाज विरोधी धोरणाच्या विरोधात हे “बोंबाबोंब आंदोलन” करण्यात आले.

या आंदोलनात सुमित्र अहिरे,विलास चिकणे,अलका चिकणे,आर.बी.परदेशी,विजय सुरवाडे,अजित भालेराव,सुकदेव तायडे, सुनिल देहडे,नितीन गाढे,महेंद्रकुमार तायडे,आनंद जाधव,महेश तायडे, अमजद रंगरेज, डॉ.शाकीर शेख, रविंद्र गायकवाड,अशोक भालेराव,पंकज तायडे,किरण विजय बि-हाडे,महेंद्र चंद्रभान जोहरे,आदेश लोंढे,मयुर तायडे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मा.राज्यपाल,मा.मुख्यमंत्री,मा.वैद्यकीय शिक्षण मंत्री,मुख्य सचिव,मा.अध्यक्ष अनु.जाती-जमाती आयोग,मा.लोकायुक्त, महाराष्ट्र राज्य यांना अप्पर जिल्हाधिकारी महाजन यांना निवेदन दिले आहे. किशोर नरवाडे,सुमित्र अहिरे,विलास चिकणे,अलका चिकणे,नितीन गाढे व सुनिल देहडे यांनी अप्पर जिल्हाधिकारी महाजन साहेबांना निवेदन दिले.
यावेळी बोंबाबोंब आंदोलनात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघ, राष्ट्रीय मुलनिवासी महिला संघ,प्रोटान, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय मुलनिवासी पेन्शनर संघ, राष्ट्रीय मुलनिवासी असंघटित कामगार संघ, भारतीय विद्यार्थी मोर्चा या सामाजिक संघटना सहभागी घेतला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम