पदके गंगा नदीत सोडण्यावर आंदोलक ठाम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मे २०२३ ।  गेल्या काही दिवसापासून भारतातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहविरोधात केलेले आंदोलन अद्याप कायम असून कुस्तीपटूंनी मंगळवारी आपण मिळवलेली पदके गंगा नदीत सोडण्याचेही पाऊल उचलले. लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या ब्रिजभूषण यांना तुरुंगात टाकण्याची मागणी कुस्तीपटू करीत आहेत.

पण केंद्रीय यंत्रणेकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्यामुळे कुस्तीपटू मागे हटण्यास तयार नाहीत. या प्रकरणाचा फटका भारतीय कुस्ती संघटनेला बसण्याची दाट शक्यता आहे. जागतिक कुस्ती संघटना ब्रिजभूषण यांच्याविरोधात होत असलेल्या चौकशीवरून नाराज आहे. तसेच त्यांच्याकडून भारतीय कुस्ती संघटनेला तंबी देण्यात आली आहे. आगामी ४५ दिवसांत नव्याने निवडणुका घेतल्या नाही, तर निलंबनाच्या शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय कुस्तीपटू अनेक दिवसांपासून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. भारतातील केंद्रीय यंत्रणेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कुस्तीपटूंना जी वागणूक दिली जात आहे, तीही अयोग्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्येही पारदर्शकता दिसून येत नाही, अशी टीका जागतिक कुस्ती संघटनेकडून याप्रसंगी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम