भाजपच्या आमदाराला गुन्हेगाराने दिली धमकी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ मे २०२३ ।  राज्यातील भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांना घरात घुसून मारण्याची धमकी एका सराईत गुन्हेगाराने फेसबुक लाइव्ह करत दिली आहे. धमकी देणाऱ्या सागर गवसणे याने सोशल मीडियावर व्हिडीओ प्रसारित केला असून, तो व्हायरल झाला आहे. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

BJP add

जामखेड सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अमित चिंतामणी यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. यात चिंतामणी यांनी म्हटले आहे कि, ३० मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्ताने कामाची तयारी करण्यासाठी चोंडी येथे गेलो होतो. त्यावेळी मला सागर गवसणे याच्या मोबाइलवरून फोन आला. तुम्ही आमदार प्रा. शिंदे साहेबांच्या जवळ आहात. त्यांना जुळवून घ्यायला सांगा. नाहीतर पाहून घेईन, असे त्याने धमकावले. त्यानंतर मी आमदार प्रा. शिंदे यांची भेट घेतली व याची माहिती दिली. या घटनेनंतर गवसणे याने ‘मैत्री ग्रुप’ या अकाउंटवरून फेसबुक लाइव्ह करत आमदार प्रा. शिंदे व काही अपरिचित व्यक्तींचे नाव घेऊन घरात घुसून मारण्याची धमकी दिली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम