पी.व्ही.सिंधू सलामीलाच पराभूत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ जुलै २०२३ ।  देशाला दोनवेळेची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधू बुधवारी जपान ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात चीनची झेंग यी मान हिच्याकडून सरळ गेममध्ये पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली. सिंधूला चीनच्या खेळाडूने केवळ ३२ मिनिटांत १२-२१, १३-२१ ने पराभूत केले.

सिंधू यंदा १३ बीडब्ल्यूएफ विश्व टूर स्पर्धांमध्ये सातव्यांदा पहिल्या सामन्यात पराभूत झाली. दुखापतीतून सावरल्यानंतर सिंधू अपेक्षित कामगिरीत अपयशी ठरल्याने विश्व क्रमवारीत तिची १७ व्या स्थानी घसरण झाली. सिंधू सतत चुका करीत असून, आपल्या तुलनेत कमी रैंकिंग असलेल्या खेळाडूंवर विजय नोंदविण्यात अपयशी ठरत आहे. सिंधूने १८ व्या स्थानावरील झेंगला मे महिन्यात मलेशिया ओपनच्या उपांत्यपूर्व सामन्यात नमविले होते. त्याचा वचपा झेंगने आज काढला. झेंगचा सिंधूवर पाच सामन्यांत हा तिसरा विजय होता. कोरिया ओपन विजेती जोडी चिराग शेट्टी- सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यांनी पहिल्या सामन्यात इंडोनेशियाचे रोली कर्नाडो- डॅनियल मार्टिन यांचा २१-१६, ११-२१, २१-१३ ने पराभव केला. लक्ष्य सेनने आपलाच सहकारी प्रियांशू राजावतचा तीन गेममधील कडव्या संघर्षात २१-१५, १२ २१, २४-२२ ने पराभव केला. मिथुन मंजुनाथ पहिला गेम जिंकल्यानंतरही १ तास २५ मिनिटांच्या संघर्षात चीनचा वेंग होंग येंग याच्याकडून पराभूत झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम