आमदार – खासदारांमध्ये राडा ; एकमेकाविरोधात गुन्हे दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ जून २०२३ ।  राज्यातील सातारा शहरात आमदार व खासदारांमध्ये पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची घटना दि.२१ रोजी घडली आहे. यावेळी त्यांच्या समर्थकांत धक्काबुक्की आणि जोरदार राडा झाला. भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आपल्या समर्थकांसह बुधवारी आमने-सामने आले होते. या राडाप्रकरणी सातारा शहर पोलिसांनी परस्परांच्या तक्रारीवरुन उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हे दाखल केले आहेत. राडाप्रकरणी जवळपास ५० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, गुन्हे दाखल झाल्यानंतर कराड येथे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. कराड येथील गेस्ट हाऊसमध्ये देवेंद्र फडणवीस सध्या मुक्कामी आहेत. येथे प्रथम आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली व बंद दाराआड त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यानंतर उदयनराजे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली व चर्चा केली. या दोन्ही राजेंनी फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा केली, हे अद्याप समोर आले नाही. दरम्यान, देवेंद्र फडणवीस या दोन्ही राजेंमधील वादावर पडदा टाकणार का?, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान, दोन्ही राजेंच्या भेटीसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, दोन्ही राजेंसोबत विकासकामांबाबत चर्चा झाली. दोन्ही राजे विकासकामांसाठी आग्रही आहे. काल जे काही घडेल ती काही फार गंभीर घटना नाही. विकासावरुन अशा घटना घडत असतात.

भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे की, सातारा बाजार समितीच्या इमारतीच्या विकासाचे काम चालू असताना उदयनराजे व त्यांच्या समर्थकांना आम्ही कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या तसेच पोलिसांनी त्यांना व आम्हाला शांततेचे आव्हान केले. तरीही, उदयनराजे व समर्थकांनी आमचे तसेच पोलिसांचे काही ऐकले नाही. उदयनराजे भोसले यांनी मला ही माझ्या मालकीची जमिन आहे. परत पाय ठेवला तर पाय काढुन खल्लास करिन, अशी धमकी दिली. तसेच आम्ही त्याठिकाणी विकास कामासाठी ठेवलेला लोखंडी कंटेनर पोकलेने तोडफोड करून अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान केले आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे की, सातारा येथील संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या हद्दीत माझ्या मालकीची जमीन आहे. तरीदेखील आम्हाला कोणतीही पूर्वसूचना न देता शिवेंद्रसिंह राजे व त्यांच्या समर्थकांनी आमच्या जागेत बेकायदेशीर घुसखोरी करत कायमस्वरुपी बांधकाम करण्याचा प्रयत्न केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम