बातमीदार | ७ सप्टेंबर २०२३ | बॉलिवूडमध्ये अनेक प्रसिद्ध अभिनेते अभिनेत्री आपल्या वेगवेगळ्या कारणाने नेहमीच चर्चेत येत असतात. यात असलेल्या अभिनेत्री त्यांच्या सौंदर्य आणि अभिनयामुळे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत. पण अभिनेत्री राधिका आपटे हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देताना राधिका मागे-पुढे पाहत नाही. राधिका हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये, वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. ‘पार्च्ड’, ‘रक्त चरित्र’, ‘रक्त चरित्र 2’, ‘शोर इन द सिटी’, ‘मांझी द माउंटमॅन’, ‘बदलापूर’ यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं.
राधिका हिने अनेक सिनेमे आणि सीरिजमध्ये काम करत स्वतःची ओळख निर्माण केली. पण झगमगत्या विश्वातील यशाच्या प्रवासात अभिनेत्रीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. करियरच्या सुरुवातीला तर राधिकाने इंडस्ट्रीमध्ये वाईट गोष्टींचा सामना केला. अनेक मुलाखतींमध्ये आलेल्या अनुभवांचा खुलासा केला. झगमगत्या विश्वात काम करत असताना राधिका अनेक वेळा वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. सुरुवातीला राधिका हिने दाक्षिणात्य सिनेविश्वातून अभिनयास सुरुवत केली. सिनेमाची शुटिंग सुरु असताना प्रसिद्ध अभिनेता राधिका हिच्या जवळ आला आणि तिच्या पायांना हात लावू लागला. अभिनेत्याची वागणूक राधिक हिला आवडली नाही आणि अभिनेत्रीने त्याला विरोध केला. शुटिंगच्या सेटवर भयानक परिस्थिती ओढावल्यामुळे अभिनेत्रीने सर्वांसमोर अभिनेत्याच्या कानशिलात लगावली. या धक्कादायक गोष्टीचा खुलासा राधिका हिने एका टॉक शोमध्ये केला होता. आज राधिका हिचा वाढदिवस असल्यामुळे अभिनेत्रीबद्दल अनेक चर्चा रंगत आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम