‘पप्पू’ म्हणणाऱ्याना राहुल गांधीनी दाखविला पराभव !
दै. बातमीदार । १३ मे २०२३ । देशातील कर्नाटक विधानसभा निवडणुकाचा निकाल आज जाहीर होत आहे. त्यात बहुमतासाठी असणारे संख्याबळ कॉंग्रेसने पूर्ण केले असून यात भाजपने देखील पराभव स्वीकारला आहे. देशातील कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना भाजपचे अनेक नेते पप्पू म्हणून हिणवत होते. त्याच पप्पूने भाजपचा पराभव करून दाखविला आहे. निवडणुकीत काँग्रेसनं बहुमताचा आकडा पार केल्याचं निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. तर भाजप सत्ता राखण्यात अपयशी ठरला आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, कर्नाटक विधानसभा निवडणुकीत २२४ जागांपैकी ११३ जागा बहुमताचा आकडा आहे. हा आकडा काँग्रेसनं पार केला असून १२८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत, तर ८ जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर भाजपनं ६० जागा जिंकल्या असून ५ जागांवर ते आघाडीवर आहेत. तर जनता दल सेक्युलर या पक्षाला १९ जागा मिळाल्या आहेत. दोन जागांवर अपक्ष आणि प्रत्येकी एका जागेवर कल्याण राज्य प्रगती पक्ष आणि सर्वोदय कर्नाटक पक्ष यांच्या उमेदवारांचा विजय झाला आहे. दरम्यान, पक्षनिहाय मतांची विभागणी पाहिल्यास यामध्ये काँग्रेसला ४२.९८ टक्के, भाजपला ३५.९१ टक्के तर जेडीएसला १३.३३ टक्के मतं मिळाली आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसला ०.२७ टक्के आणि नोटाला ०.६९ टक्के मतं मिळाली आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम