राहुल गांधी यांचा ताफा मणीपुरात पोलिसांनी अडवला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  देशाचे काँग्रेस नेते राहुल गांधी आज गुरुवारी दुपारी दोन दिवसांच्या मणिपूर दौऱ्यावर पोहोचले. पण त्यांच्या ताफ्याला पोलिसांनी इंफाळपासून 20 किमी अंतरावर असलेल्या विष्णुपूरजवळ थांबवले. त्यानंतर ते इंफाळला परतले. राहुल चुरचंदपूर रिलीफ कॅम्पमध्ये पीडितांना भेटण्यासाठी जात होते. पण वाटेत हिंसाचार होऊ शकतो, असे पोलिसांचे म्हणणे आहे, त्यामुळे त्यांचा ताफा थांबवण्यात आला.

पोलिस अधिकारी म्हणाले की, बिष्णुपूर जिल्ह्यात महामार्गावर टायर जाळण्यात आले आणि ताफ्यावर काही दगडफेकही झाली. अशा घटना पुन्हा घडण्याची भीती आहे, त्यामुळे खबरदारी म्हणून हा ताफा बिष्णुपूर येथे थांबवण्यात आला. त्यामुळे आता राहुल गांधी हेलिकॉप्टरद्वारे चुराचंदपूरला जाणार आहेत.काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, पोलीस म्हणतात ते आम्हाला परवानगी देऊ शकत नाहीत. राहुल गांधींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे आहेत. पोलिसांनी आम्हाला का थांबवले हे समजू शकलेले नाही.

राहुल गांधी मणिपूरमधील मदत शिबिरांना भेट देणार आहेत, तसंच विविध समाजाच्या नेत्यांना भेटणार आहेत. ते 30 जूनपर्यंत मणिपूरमध्येच असतील. मणिपूर काँग्रेसचे अध्यक्ष ओकराम इबोबी सिंग यांनी सांगितले की, राहुल यांचे ज्येष्ठ नागरिक आणि इतर नेत्यांना भेटण्याचे नियोजन आहे. मणिपूरमध्ये 3 मेपासून कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात आतापर्यंत 131 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 419 जण जखमी झाले आहेत. 65,000 हून अधिक लोकांनी घरे सोडली आहेत. जाळपोळीच्या 5 हजारांहून अधिक घटना घडल्या आहेत. सहा हजार गुन्हे दाखल करण्यात आले असून 144 जणांना अटक करण्यात आली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम