ठाकरेंच्या अडचणीत वाढ ; 13 जणांवर गुन्हा दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ जून २०२३ ।  राज्याचे माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे. त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अधिकृतपणे १९ बंगले बांधल्याचा आरोप आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला.

काही महिन्यांपूर्वी याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला होता. अलिबागमधील कथित 19 बंगल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजी माजी ग्रामसेवक आणि सरपंचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नियमबाह्य बांधकाम परवानगी दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

यापूर्वी रेवदंडा पोलिसांनी कोरलाई गावचे माजी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती. अलिबागमधील कथित 19 बंगल्यांच्या प्रकरणात पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, याबाबत तक्रार दाखल झालेली आहे. आता लवकरच चार्जशीट तयार होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम