राहुल गांधींच्या अडचणी वाढणार ; न्यायालयाने दिली नोटीस

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३

कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढल्या आहे. मोदी आडनावावरुन कॉंग्रेस नेते खासदार राहुल गांधी चांगलेच अडचणीत आले होते. हे प्रकरण मिटले असतानाच राहुल गांधी यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. भारत जोडो यात्रेत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप राहुल गांधी यांच्यावर होत असून या प्रकरणी लखनौ जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना नोटीस पाठवली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राहुल गांधी यांच्यासाठी पुन्हा एकदा धोक्याची घंटा वाजली आहे.काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल गुन्ह्याच्या प्रकरणातील याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्वीकारली आहे. तसेच राहुल गांधी यांना नोटीसही पाठवण्यात आली आहे. हे प्रकरण एमएलए कोर्टाच्या विशेष न्यायाथीशांच्या न्यायालयात स्थानांतरित करण्यात आले आहे. १ नोव्हेंबरला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.

याआधी राहुल गांधी यांच्याविरोधात दाखल केलेली तक्रार फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अश्विनी कुमार त्रिपाठी यांनी स्विकारली आहे. राहुल गांधी यांनी १७ नोव्हेंबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील अकोला येथे जाणीवपूर्वक सावरकरांविरोधात भाष्य केल्याचा आरोप करण्यात आला होता. आता या प्रकरणी १ नोव्हेंबरला होणाऱ्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम