उपचारा दरम्यान पत्नीचा मृत्यू तर पतीने दिला जीव !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १ ऑक्टोंबर २०२३ | दुचाकीने पती- पत्नी जात असताना दोघांचा अपघात झाला. या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर उपचार सुरु असताना पत्नीचा मृत्यू झाला. पत्नीच्या मृत्यूची बातमी समजताच विरहात पतीने थेट धावत्या रेल्वेखाली झोकून देत आत्महत्या केली. ही घटना नशिराबाद पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

राजू सोनसिंग राठोड (वय ३०, रा. बोदर्डी, बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. २९ सप्टेंबरला जळगाव-भुसावळदरम्यान भादली रेल्वेस्थानकाजवळ तीस वर्षीय तरुणाचा रेल्वेखाली येऊ मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. घटनेची माहिती मिळताच नशिराबाद पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळावर दाखल झाले. पंचनामा करून जिल्हा शासकीय रुग्णालय तथा वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले. नशिराबाद पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविली. कपड्यात मिळालेल्या कागदावरून त्याचे नाव राजू सोनसिंग राठोड असे असल्याचे निष्पन्न झाले.
राजू राठोड याच्या मृत्यूचे कारण समोर येताच पोलिसही थबकले. तीन दिवसांपूर्वीच संगीता राठोड यांच्या मृत्यूप्रकरणी याच नशिराबाद पोलिसांत झीरो नंबरने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असताना आज पती राजू राठोड यांच्या मृत्यूचीही तशीच नोंद करण्यात आली. पोलिस नाईक अतुल महाजन तपास करीत आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम