राहुल नार्वेकर दिल्लीला जाणार ? शिंदे गटाचे आमदाराने सांगितले !
बातमीदार | २१ सप्टेंबर २०२३
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपल्याला कोर्टाकडून कोणतीही ऑर्डरची कॉपी आलेली नाही. याबाबतचे आदेश आपल्याला प्राप्त झाल्यानंतर आपण त्याचा अभ्यास करु आणि मग भूमिका मांडू, अशी प्रतिक्रिया राहुल नार्वेकर यांनी दिली होती. त्यानंतर राहुल नार्वेकर आज दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती समोर आलीय. दिल्ली जाण्याचा आपला हा नियोजित दौरा आहे, असं नार्वेकर यांनी सांगितलंय. पण शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी बातमी फोडली आहे.
शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या पुढच्या रणनीतीबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांनी जरी आपला दिल्लीचा दौरा हा नियोजित दौरा असल्याचं सांगितलं असलं तरी, पडद्यामागे काहीतरी वेगळं घडतंय असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात घडणाऱ्या घडामोडींना महत्त्व प्राप्त झालंय.“विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कायदे तज्ज्ञांशी चर्चा करण्यासाठी दिल्लीला गेले आहेत. कायदे तज्ज्ञ जे मार्गदर्शन करतील त्यानुसार या ठिकाणी कारवाई केली जाईल. यापूर्वीच त्यांनी दोन आठवड्याचा वेळ दिला होता. पण आता घाई जास्त आहे”, असं सांगत संजय शिरसाट यांनी आतली बातमी फोडली आहे. “हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाचे आम्ही पालन करू. जे काही आदेश आम्हाला देण्यात येतील किंवा जी काही भूमिका आम्हाला मांडायची असेल ती आम्ही योग्य पद्धतीने मांडू”, असं संजय शिरसाट म्हणाले. “एक-दोन दिवसांमध्ये आम्हालाही नोटीस येतील. या नोटीसचे उत्तर आम्ही सुद्धा देऊ. आमची बाजू भक्कम आहे, असं आम्ही यापूर्वी म्हणालो आहोत. आम्ही आताही म्हणतोय”, असं संजय शिरसाट म्हणाले. यावेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. “संजय राऊत काय बोलतात? याला काही अर्थ नाहीय. तिरडी कुणाची बांधली आहे हे त्यांना लवकरच समजेल. तिरडी आमची बांधलेली नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडलोय आणि आम्ही आमच्या एक स्वतंत्र पक्ष तयार केलेला आहे, जो आज राज्यात सत्तेत आहे”, असं संजय शिरसाट म्हणाले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम