राज्यात ४ दिवस पावसाचे सावट कायम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  राज्यातील बदलत्या हवामानाने आज पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने दाट शक्यता वर्तवली आहे. तर दुसरीकडे कमाल तापमानातही वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उद्यापासून उघडीप देण्याची चिन्हे आहेत.

तामिळनाडू किनारपट्टी आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर, तसेच उत्तर कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर आज मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान खात्याने या तीन राज्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. केरळ, महाराष्ट्र व तामिळनाडूत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दरम्यान, शुक्रवारी महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. नाशिक, धुळे, परभणी, बीड व लातूर ह्या जिल्ह्यात हलक्या स्वरूपात पाऊस झाला. राज्यात पावसाळा आणखी काही दिवस मुक्कामी राहू शकतो. 7 ते 9 मेदरम्यान बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी हा इशारा दिला. या चक्रीवादळाला ‘मोचा’असे नाव देण्यात आले आहे. या वादळामुळे पूर्व भागातच नव्हे तर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये आणखी 4 दिवस पावसाळी वातावरण राहू शकते. तर राज्यात सुरू असलेला वादळी पाऊस उद्यापासून उघडीप देण्याची चिन्हे आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम